Bank Of Maharashtra Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये महिला खेळाडूंसाठी नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६४००० रुपये मासिक वेतन

Bank Of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. महिला खेळांडूसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
Bank Of Maharashtra Recruitment
Bank Of Maharashtra RecruitmentSaam Tv

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये महिला खेळाडूंसाठी भरती करण्यात येत आहे. बँक ऑप महाराष्ट्र ही पब्लिक सेक्टरमधील खूप मोठी बँक आहे. या नोकरीसाठी महिला अर्ज करु शकणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. बँकामध्ये होत असलेल्या आंतरबँक , राज्य पातळी आणि देश पातळीवर होत असलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी या महिला खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्याचसाठी ही भरती सुरु आहे.

Bank Of Maharashtra Recruitment
Mumbai Airport Job: नोकरी शोधताय? मुंबई विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

या नोकरीसाठी १३ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा १८-२५ निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १० वी पास असले पाहिजे. त्याचसोबत खेळात ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम डिपार्टमेंट, हेड ऑफिस, लोकमंगल १५०१, शिवाजीनगर, पुण ४११ ०११ या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

Bank Of Maharashtra Recruitment
UCO Bank Recruitment: युको बँकेत ५४४ शिकाऊ पदांसाठी भरती;अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

हा अर्ज कोणत्या पद्धतीने पाठवायचा आहे, याची सर्व माहिती बँकेच्या वेबसाइटवर दिली आहे. यासाठी तुम्ही https://bankofmaharashtra.in/writereaddata/documentlibrary/06de871c-4b95-437c-93df-d934d42459d4.pdf या लिंकवर जाऊन माहिती मिळवू शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला २४०५० ते ६४४८० रुपये मासिक वेतन मिळेल. हे वेतन तुमच्या अनुभवावर अवलंबून असेल.

Bank Of Maharashtra Recruitment
SBI Recruitment 2024 Eligibility: स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com