Shruti Vilas Kadam
पुरुषांमध्ये केस गळण्याचं मुख्य कारण अँड्रोजेनेटिक अॅलोपेशिया म्हणजेच हार्मोनल बदल असतात. DHT नावाचा हार्मोन केसांच्या मुळांना कमजोर करतो.
पचन नीट नसेल, गॅस, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठता असेल तर शरीराला आवश्यक पोषक घटक नीट मिळत नाहीत. त्यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.
आयरन, प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास केस गळण्याची समस्या वाढू शकते. पोटाचे विकार असल्यास ही पोषकद्रव्ये नीट शोषली जात नाहीत.
ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे केस गळणे अधिक वाढू शकते.
फास्ट फूड, तेलकट आणि जंक फूड जास्त खाल्ल्यास पचन बिघडते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि केस गळतात.
धूम्रपान, मद्यपान आणि व्यायामाचा अभाव यामुळे रक्ताभिसरण कमी होते, ज्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो.
डॅन्ड्रफ, फंगल इन्फेक्शन किंवा स्काल्प इन्फ्लेमेशनमुळेही केस गळण्याची समस्या वाढू शकते.