पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने हवा शुद्ध करण्यासाठी शहरात १६ ठिकाणच्या मुख्य चौकांत कारंजे बसविण्यात आले आहेत. त्या कारंजांसाठी पाणी साठा करणाऱ्या टाक्यांमध्येच चक्क डेंगूच्या अळ्या आढळल्या आहेत.
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पावसाळा सुरू झाल्याने डेंगूच्या डासांची उत्पत्ती ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणचे सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात जवळपास १४५० घरांमध्ये डेंगूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. टायर पंक्चरची दुकाने आणि बांधकामची जवळपास २८२ ठिकाणी या डेंग्यूच्या (Dengue) अळ्या आढळून आल्याने ५८५ मालकांना या संदर्भात नोटिसा देत ७२ हजार रुपयांचा दंड पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने वसूल केला आहे.
दरम्यान डेंग्यूच्या अळ्या महापालिकेच्या टाक्यांमध्ये देखील आढळून आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांकडून दंड वसूल करणारा महानगरपालिका प्रशासन आता स्वतःच्या संबंधित विभागावरती व ठेकेदारावर काय कारवाई करणार असा संतप्त सवाल नागरिक आता विचारू लागले आहेत. तसेच ठेकेदारांनीसाठी वेगळा न्याय का करत आहे. असा सवाल या निमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.