Shahapur Fire News : शहापुरमध्ये तीन दुकाने आगीत खाक; लाखोचे नुकसान, सुदैवाने परिवार बचावला

Bhandara News : पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आगी लागली. आगीचे लोळ निघल्याने धावपळ सुरु झाली. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले
Shahapur Fire News
Shahapur Fire NewsSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग ५३ च्या कडेला असलेल्या शहापूर येथे तीन दुकानांना आज पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली असून तिन्ही दुकानांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Shahapur Fire News
Wardha Rain : वर्धेत पावसाची उघडीप; शेतकऱ्यांची चिंता वाढली, स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न

शहापूर (Shahapur) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या नूतन हार्डवेअर, नूतन ऑटोमोबाईल्स अँड इलेक्ट्रिकल्स तसेच शेजारी लागूनच असलेल्या फर्निचरच्या दुकानाला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. आगीचे लोळ निघल्याने धावपळ सुरु झाली. पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले. आगीमध्ये तिन्ही दुकानांतून साहित्य जळून राख झाले. आगीमुळे तीन वाहनांचा सांगाडाच शिल्लक राहिला. आगीमध्ये तिन्ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

Shahapur Fire News
Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबारायांच्या पालखीला यंदा चेन्नईहून मागविली छत्री; लोखंडाऐवजी बांबूच्या चिमट्यांचा वापर

मोठा अनर्थ टळला 

तिन्ही दुकाने गावाच्या शेवटच्या भागात असल्याने आग इतरत्र पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्यावतीने आग नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तीन दुकानांपैकी दोन दुकानांचे मालक व त्यांचे कुटुंब दुकानाच्या आत असलेल्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. दुकानांमध्ये आग लागल्याने त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. (Fire Brigade) अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com