Wardha Rain : वर्धेत पावसाची उघडीप; शेतकऱ्यांची चिंता वाढली, स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न

Wardha News : वर्धा जिल्ह्यात सुरवातीला पेरणी अनुकूल पाऊस झाला. या पावसानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलीय
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास 

वर्धा : सुरवातीला मान्सूनचा पाऊस आल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीचे काम केले होते. चांगला पाऊस झाल्यामुळे पिके देखील उंगली होती. मात्र यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके मान टाकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आता पिकांना वाचविण्यासाठीची धावपळ सुरु झाली आहे. 

Wardha News
Akola Corporation : सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सव्वा कोटीचा अपहार; अकोला मनपाच्या सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल

वर्धा (Wardha) जिल्ह्यात सुरवातीला पेरणी अनुकूल पाऊस झाला. या पावसानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलीय. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर मात्र पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतातील पिके वाचविण्यासाठी आता शेतकरी धडपड करत असून स्प्रिंकलरच्या सहाय्याने पिकांना जीवनदान देण्याचा प्रयत्न (Farmer) शेतकरी करत आहे. बागायतदार शेतकरी पिकांना पाणी देऊ लागले आहेत. 

Wardha News
Bogus Certificate: चक्क ५०० रुपयात मिळतोय बोगस जातीचा दाखला; नंदुरबार जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून देणारे रॅकेट सक्रिय

तर करावी लागणार दुबार पेरणी 

सिंचनाची व्यवस्था असलेले शेतकरी पाऊस (Rain) नसल्याने पिकांना वाचविण्यासाठी पाणी देत आहेत. मात्र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही; अश्या शेतकऱ्यांना पाणी देता येणे शक्य नाही. यामुळे आगामी काही दिवसात पाऊस झाला नाही तर त्यांच्यावर दुबार पेरणीच संकट आले आहे. अद्यापही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली नाहीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com