Bogus Certificate: चक्क ५०० रुपयात मिळतोय बोगस जातीचा दाखला; नंदुरबार जिल्ह्यात बोगस कागदपत्र तयार करून देणारे रॅकेट सक्रिय

Nandurbar News: Bogus Certificate Racket in Nandurbar | विद्यार्थी आणि पालकांना कमी वेळेत दाखले मिळून देण्याचे आमिष दाखवत कॉम्पुटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहूब प्रमाणपत्र तयार करून देत आहेत.
Bogus Certificate
Nandurbar Bogus CertificateSaam TV

सागर निकवाडे 

नंदुरबार : शाळा, महाविद्यालय सुरू झाली असून विद्यार्थ्यांना जातींच्या दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहेत. कमी वेळेत दाखले तयार करून घेण्यासाठी सर्वच पालक आणि विद्यार्थी हे धडपड करत असतात. तर याच गोष्टीचा फायदा घेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा या तालुक्यांमध्ये काही सायबर कॅफे चालक विद्यार्थी आणि पालकांकडून ५०० रुपये घेत अवघ्या पाच मिनिटात जातीचे दाखले तयार करून देत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bogus Certificate
Akola Corporation : सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सव्वा कोटीचा अपहार; अकोला मनपाच्या सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल

सायबर कॅफेच्या नावाखाली अनेक ठग हे आपले दुकान चालवत असतात. विद्यार्थी आणि पालकांना (Nandurbar) कमी वेळेत दाखले मिळून देण्याचे आमिष दाखवत कॉम्पुटरवर अवघ्या काही मिनिटातच बोगस हुबेहूब प्रमाणपत्र तयार करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या जुन्या प्रमाणपत्रावरच नाव आणि इतर माहिती बदल करून हे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याची बाब समोर आली आहे. यात सायबर चालकांसोबत ग्रामपंचायतीत (Grampanchayat) असलेले काही ऑपरेटर देखील बोगस प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Bogus Certificate
Poshan Aahar : शालेय पोषण आहाराला लागली किड; पुणे जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

स्कॅनरमध्ये तपासणीनंतर समोर येतो प्रकार 
जातीच्या प्रमाणपत्र सोबत उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल यासोबत जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे अनेक लहान मोठे दाखले देखील बोगस पद्धतीने तयार केले जात आहेत. मात्र हे प्रमाणपत्र ज्यावेळेस स्कॅनरने तपासले जातात; त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याच समोर येत असून यात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

गुन्हे दाखल करण्याचे आदेश 
बोगस प्रमाणपत्रांचे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत शहादा प्रांतअधिकारी सुभाष दळवी यांना ज्यावेळी माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ गोष्टी गंभीर्याने घेत जिल्ह्यातील तहसीलदारांना बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आला आहे.. मात्र या बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर खरंच गुन्हा दाखल होतो का? कि फक्त नावापुरती कारवाई होते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com