अंबरनाथ : पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदान दरम्यान मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी काढून व्हायरल करण्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. अंबरनाथमध्ये भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांचा हा सेल्फी व्हायरल झाला आहे.
निवडणुकीत (Election) बॅलेट बॉक्सच्या आत मोबाईल वापरण्यास किंवा फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई असून आजवर असे प्रकार समोर आल्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र असं असतानाही भाजपाच्या अंबरनाथ महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसोबत सेल्फी काढला. यानंतर हा सेल्फी व्हॉटसअपच्या स्टेटसला ठेवला, तसंच फेसबुकवरही टाकला.
कोकण पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार समोर आला. (BJP) सुजाता भोईर यांनी व्हायरल केलेला फोटो काही वेळातच हा शहरात व्हायरल झाला. हा सेल्फी सध्या शहरात व्हायरल झाला असून याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर आता प्रशासन आणि पोलिसांकडून काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.