PGCIL Recruitment Saam Tv
naukri-job-news

PGCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी अन् २२ लाखांचं पॅकेज; PGCIL मध्ये भरती सुरु; आजच करा अर्ज

PGCIL Recruitment 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ऑफिसर ट्रेनी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. तु्म्हीही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पीजीसीआयएलमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लाखो रुपयांचे पॅकेजदेखील मिळणार आहे.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत सध्या ऑफिसर ट्रेनी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. www.powergrid.in या वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२५ आहे.

पगार

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एकूण २० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा २८ वर्षे असावी. या नोकरीसाठी तुम्हाला २२ लाखांचे पॅकेज मिळणार आहे.यामध्ये ट्रेनिंगच्या वेळी ११ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर २२.५० लाखांचं पॅकेज मिळणार आहे.

पीजीसीआयएलमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि ग्रुप डिस्कशनद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पात्रता

पीजीसीआयएलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे (CA)/ICWA (CMA)पदवी असावी.या नोकरीसाठी तुम्हाला www.powergrid.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.तुम्हाला तिथे करिअर सेक्शनमध्ये जाऊन Recruitment Of Officer Trainee (Finance) & Officer Trainee (CS) यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर फॉर्म भरुन सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Chutney Recipe: वरण भात खाऊन कंटाळलात? मग ही खोबऱ्याची चटपटीत चटणी करून पाहाच

White Hair Care: पांढरे केस नॅचरली होतील काळे, हा घरगुती सामग्रीपासून तयार केलेला हेयरडाई महिन्यातून २ वेळा लावा केसांना

Amruta Khanvilkar Hot Pics: अमृताचा हॉट लूक, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

EPFO News: EPFO च्या PF खात्यावर मिळतो 7 लाख रुपयांचा विमा कव्हर; जाणून घ्या कसा फायदा मिळतो?

Maharashtra Live News Update: मुंबईत मनसेची महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT