सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी
ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु
१०वी आणि १२वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी
सरकारी नोकरी करण्याची तरुणांकडे सुवर्णसंधी आहे. ऑइल इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑइल इंडियामध्ये सध्या वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०वी, १२वी किंवा टेक्निकल कोर्स केलेल्या तरुणांसाठी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. चांगल्या सरकारी नोकरीची संधी आहे.
ऑइल इंडियामध्ये (Oil India) ग्रेड III, ग्रेड V आणि ग्रेड VII पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑइल इंडियामधील ही भरती २६२ पदांसाठी होणार आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या तरुणांना करिअरची संधी असणार आहे.
ऑइल इंडियामधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे.इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
या नोकरीसाठी इच्छुकांनी oil-india.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. हा नोकरीसाठी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत फायर अँड सेफ्टीमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.
काही पदांसाठी उमेदवारांनी १२वी पास असणे गरजेचे आहे. बीएससी, नर्सिंग डिप्लोमा किंवा हिंदीमध्ये ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना २०० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना, दिव्यांग व्यक्तींना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारांना चांगले वेतन मिळणार आहे. ग्रेड III पदासाठी २६,६०० ते ९०,००० रुपये पगार मिळणार आहे. ग्रेड V पदासाठी ३२,००० ते १,२७,००० रुपये पगार मिळणार आहे. ग्रेड VII पदांसाठी ३७,५०० ते १,४५,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर सरकारी सुविधा आणि भत्तेदेखील मिळणार आहेत.
ऑइल इंडिया भरती 2025 मध्ये किती पदांसाठी भरती जाहीर झाली आहे?
ऑइल इंडिया भरती 2025 मध्ये एकूण 262 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
ग्रेड III, ग्रेड V आणि ग्रेड VII या पदांसाठी भरती होणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
ऑइल इंडियामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे.
वयोमर्यादा किती आहे?
उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गासाठी सूट आहे.
पगार किती मिळेल?
ग्रेड III: ₹26,600 ते ₹90,000
ग्रेड V: ₹32,000 ते ₹1,27,000
ग्रेड VII: ₹37,500 ते ₹1,45,000
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.