
८ वा वेतन आयोग लागू होण्याची प्रतिक्षा सुमारे १ कोटी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक करत आहेत.
कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीजच्या रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर 1.8 असू शकतो, ज्यामुळे १३% पगारवाढ होण्याची शक्यता.
फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनावर लागू होतो, त्यामुळे वाढ ही बेसिक पगाराच्या आधारावर होते.
याआधीच्या वेतन आयोगांमध्येही वेगवेगळ्या टक्क्यांनी पगारात वाढ झाली असून ६ व्या आयोगात सर्वाधिक ५४% वाढ झाली होती
केंद्र सरकारच्या ३३ लाखहून अधिक कर्मचारी आणि ६६ लाखांहून पेन्शनधारक ८ वा वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये तगडी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काहींच्या हाती निराशा हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिजच्या एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती समोर आली आहे. ८ वा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८ टक्के होऊ शकतो. त्यामुळे पगारात १३ टक्के वाढ होऊ शकते.
एंबिट कॅपिटलच्या मागील रिपोर्टमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये सातवा वेतन आयोगात पगार १४.३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोटक इन्स्टिट्युशनल इक्टिटीजच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, 'फिटमेंट फॅक्टर साधारण १.८ टक्के असू शकतो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमधील वाढ ही पूर्णपणे आयोगाने शिफारस केलेल्या फिटमेंट फॅक्टर किंवा मल्टिप्लायरवर अवलंबून असते.
फिटमेंट फॅक्टरचा वापर एखाद्या कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर नवीन मूळ वेतनाची गणना करण्यासाठी केला जातो. उदा. सातव्या वेतन आयोगात २.५७ टक्के फिटमेंट फॅक्टर ठरवण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारातील मूळ वेतन ७००० रुपयांवरून थेट १८००० रुपये झाला.
फिटमेंटचा अर्थ असा नाही की, कर्मचाऱ्यांचा पगार थेट २.५७ टक्के पटीने वाढेल. तर फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनावरच लागू होतो. त्यामुळे त्यातच वाढ होते. जर मागील वेतन आयोगात महिन्याच्या पगारात झालेल्या वाढीबाबत बोलायचं झाल्यास, दुसऱ्या वेतन आयोगास १४.२ टक्के, तिसरं वेतन आयोग २०.६ टक्के, चौथा वेतन आयोग २७.६ टक्के, पाचवा वेतन आयोग ३१ टक्के, सहावा वेतन आयोग ५४ टक्के, सातवा वेतन आयोगात १४.३ टक्के इतकी वाढ झाली.
८ वा वेतन आयोग कधी लागू होण्याची शक्यता आहे?
अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही, परंतु कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीज आणि एंबिट कॅपिटलच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत निर्णय अपेक्षित आहे.
यामध्ये फिटमेंट फॅक्टर किती असण्याची शक्यता आहे?
कोटकच्या रिपोर्टनुसार ८ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर सुमारे 1.8 असण्याची शक्यता आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय?
फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ वेतनावर आधार घेत नवीन वेतनाची गणना करण्याचा गुणोत्तर. हा मूळ पगारावरच लागू होतो.
याआधीच्या वेतन आयोगांमध्ये किती वाढ झाली होती?
दुसऱ्या आयोगात 14.2%, तिसऱ्या 20.6%, चौथ्या 27.6%, पाचव्या 31%, सहाव्या 54% आणि सातव्या वेतन आयोगात 14.3% वाढ झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.