Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी अन् ४८ लाखांचे पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

HURL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Government Job
Government JobSaam Tv
Published On
Summary

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड कंपनीत भरती

४८ लाखांचे पॅकेज मिळणार

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करायची ही उत्तम संधी आहे. हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. HURL मध्ये टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती सुरु आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये ३९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रेग्युलर नियुक्ती ३५ पदांसाठी होणार आहे. एफटीसी पदासाठी ४ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी १२ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.

Government Job
NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, २७ लाखांचं पॅकेज, अर्ज कुठे अन् कसा करावा?

या पदांसासाठी होणार भरती

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेडमध्ये टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. गोरखपुर, सिंदरी बरैनी येथे ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी ३० ते ५५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएट, लॉ ग्रॅज्युएट किंवा पीजी डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Government Job
Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरू; आजच करा अर्ज

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्ही https://jobse3.hurl.net.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला ई-मेल आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुमचा फोटो, सही आणि स्कॅन कागदपत्रे अपलोड करायची आहे.

यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट काढा.

पगार

उपाध्यक्ष (Vice President) पदासाठी जवळपास ४८ लाख रुपये पॅकेज मिळणार आहे. महिन्याला ₹1,20,000 - ₹2,80,000 पगार मिळणार आहे. अॅडिशनल चीफ मॅनेजर पदासाठी ३४ लाखांचे पॅकेज असणार आहे. सीनियर मॅनेजर पदासाठी ३०.३० लाख रुपये पगार मिळणार आहे. मॅनेजर पदासाठी २६.५० रुपये पगार मिळणार आहे.सिनियर इंजिनियर पदासाठी १५.९० लाखांचे पॅकेज मिळणार आहे.

Government Job
Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी उमेदवार एक वर्षाच्या प्रोबेशन पीरियडवर असणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांचा कामाचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे. तुमच्या पर्फॉर्मन्सवर पुढे २ वर्षांची नियुक्ती केली जाऊ शकते. टेक्निकल आणि एक्झिक्युटिव्ह पदासाठी शॉर्टलिस्टेड झालेल्या उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू किंवा स्किल एसेसमेंट ही परीक्षा द्यावी लागणार आहे.

Government Job
Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदात सरकारी नोकरीची संधी; पगार ८५००० रुपये; अशा पद्धतीने करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com