
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधार्थ असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुवर्ण संधी मिळवून देऊ शकते. भारतीय नौदलात नोकर भरती केली जाणार आहे. त्याबाबत अधिकृतपणे जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलीय. भारतीय नौदलात १११० नेव्हल सिव्हिलियन स्टॉपच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. यात ट्रेड्समन मेट, फायरमन, ड्राफ्ट्समन, स्टोअरकीपर, चार्जमन आणि मल्टी टास्किंग स्टाफ यासारख्या अनेक महत्त्वाच्या पदांवर भरती केली जाणार आहे.
ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. नोकरीचे अर्ज मागवण्याची सुरुवात ५ जुलै पासून झालीय. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ जुलै २०२५ निश्चित करण्यात आलीय. इच्छुक उमेदवारांना ५ जुलैच्या आधी अर्ज करायचा आहे. यासाठी joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर क्लिक करावं लागेल.
या भरतीसाठी दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, बीएससी आणि पदवीधर पदवी असलेले उमेदवार पात्र असणार आहेत. वेगवेगळ्या पदांनुसार वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे निश्चित करण्यात आलीय. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट देण्यात येणार आहे.
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क २९५ रुपये ठेवण्यात आले आहे. तर एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक आणि महिलांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते १,४२,४०० रुपयांपर्यंतचा पगार मिळेल. दरम्यान देण्यात येणारे वेतन पदानुसार वेगवेगळे आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरी करणार असाल तर भारतीय नौदलात सुवर्ण संधी आहे. ज्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, त्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पात्रता, निवड प्रक्रिया, पगार याबाबत सविस्तर माहिती त्यात देण्यात आलीय.
शेती, पशुपालन आणि शेतीशी संबंधित तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने २०२५ मध्ये कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) च्या एकूण ३१० पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केलीय. या पदांसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र, मत्स्यव्यवसाय, अन्न तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रात ४ वर्षांची पदवी प्राप्त केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.