NHAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

NHAI Internship: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात इंटर्नशिपची संधी; स्टायपेंड मिळणार ₹२०,०००; अर्ज कुठे अन् कसा करावा?

NHAI Summer Internship 2026: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दोन महिन्यांसाठी समर इंटर्नशिप जाहीर केली आहे.

Siddhi Hande

NHAI मध्ये काम करण्याची संधी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात समर इंटर्नशिप

दर महिन्याला मिळणार २०,००० रुपयांची पेन्शन

इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट फील्डमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. NHAI ने भरती जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या सरकारी प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. NHAI मध्ये समर इंटर्नशिपअंतर्गत काम करण्याची संधी मिळणार आहे.

NHAI मधील समर इंटर्नशिपसाठी अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करु शकतात. तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत अनेक प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामधील ही इंटर्नशिप २ महिन्याची असणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्यास मिळणार आहे. ही इंटर्नशिप दोन महिन्याची असणार आहे. या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे.

एनएचएआयमधील इंटर्नशिपसाठी निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला २०,००० रुपयांची स्टायपेंड मिळणार आहे. दोन महिन्यासाठी ४०,००० रुपये मिळणार आहे. सिविल इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ आहे. यासाठी फक्त ५ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

अर्ज कसा करावा? (NHAI Internship Application Process)

सर्वात आधी तुम्हाला NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर जायचे आहे.

यानंतर रिक्रुटमेंट सेक्शनवर जा.

यानंतर तुम्ही NHAI Summer Internship 2026 Apply टॅबवर क्लिक करा.

यानंतर Internship Application Portal वर जा. तिथे आधी रजिस्ट्रेशन करावे.

यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करा. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा.

यानंतर तुमची सर्व माहिती भरल्यानंतर एकदा चेक करा. त्यानंतर अर्ज सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावामध्ये चोरट्याने वाईन शॉपमधल्या महागड्या दारूच्या बाटल्या केल्या लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Explainer : बारामतीत काँग्रेसची पॉवरफुल खेळी; सुनेत्रा पवारांच्या विरोधात अर्ज माघार घेऊन काय मिळवलं?

Constipation Relief : उन्हामुळे पित्त अन् अपचनाचा त्रास वाढलाय? खा 'हे' ५ पदार्थ, मिनिटांत मिळेल आराम

Rashmika Mandanna Birthday : लग्नानंतर रश्मिकाचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन; वडिलांनी दिलं खास गिफ्ट, फोटो पाहून चकीत व्हाल

Mira Road Crime: शिवसेनेच्या परप्रांतीय कार्यकर्त्याकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण; कुठे घडला प्रकार?

SCROLL FOR NEXT