NMMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

NMMC Recruitment: १२वी पास आहात?नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी;जाणून घ्या सविस्तर

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment: नवी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ७६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत ७६ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबाबत सर्व माहिती तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

बालवाडी शिक्षिका, बालवाडी मदतनीस, सहाय्यक शिक्षक या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. बालवाडी शिक्षिका पदासाठी १६ जागा रिक्त आहेत. बालवाडी मदतनीस पदासाठी १२ जागा रिक्त आहेत तर सहायक शिक्षण पदासाठी ४८ जागा रिक्त आहेत. एकूण ७६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

पात्रता

बालवाडी शिक्षिका पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी पास आणि मॉन्टेसरी कोर्स केलेला असावा. बालवाडी मदतनीस पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे.सहाय्यक शिक्षक पदासाठी D.Ed किंवा B.Ed पास असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आरोग्य विभाग, ३रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नंबर ०१, १५ ओ, किल्लोगावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथे अर्ज पाठवायचा आहे. या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्ष आहे. या नोकरीसाठी उमेदवाराला ६,००० ते १०,००० रुपये वेतन मिळणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२४ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

SCROLL FOR NEXT