Sarkari Naukri 2024 Saam Tv
naukri-job-news

Sarkari Naukri 2024: महिना दीड लाख पगार, मुंबई पोर्टमध्ये नोकरीचा बेस्ट चान्स, जाणून घ्या सविस्तर माहिती

Siddhi Hande

Mumbai Port Recruitment 2024: मुंबईत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवण्याचे तरुणांचे स्वप्न असते. मुंबई पोर्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुंबई पोर्ट ऑथोरिटीमध्ये सिनियर अकाउंट्स, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, इंजिनियरसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई पोर्टमध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२४ पासून सुरु झाली आहे. तुम्ही mumbaiport.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे.

मुंबई बंदर प्राधिकरण हे बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. याअंतर्गत ग्रेड I आणि ग्रेड III च्या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. सिनियर अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट ट्राफिक मॅनेजर आणि हिंदी ट्रान्सलेटर या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन / इंजिनियर / सीए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत अधिसूचना तुम्ही वेबसाइटवर पाहू शकतात.

मुंबई पोर्ट ऑथोरिटीमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १९६००० ते १६०००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. लेखी परिक्षेनंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT