BMC Recruitment Saam TV
naukri-job-news

BMC Recruitment 2024: मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; मिळणार ९०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

BMC Job Vacancy 2024 Application Process: मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी मासिक वेतन ९० हजार रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. मुंबई महानगरपालिकेत हाय डिपोन्डन्सी युनिट सुरु करण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे. या विभागात विविध रिक्त पदे आहे. या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका वैद्यकीय अधिक्षक रुग्णालयद्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही जाहिरात पाहू शकतात.

राज्य सरकारअंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार असणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३० हजार ते ९० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत नोकरीसाठी ऑफलाइ पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याच्या उमेदवाराची वयोमर्यादा ५० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. ही नियुक्ती या वर्षासाठीत करण्यात येणार आहे.

परिचारिका, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. परिचारिका पदासाठी उमेदवाराने बारावीचे शिक्षण सायन्समधून पूर्ण केलेले असावे. तसेच जनरल नर्सिंग मिडवाइफरी ३ वर्षांचा कोर्स केलेला असावे. उमेदवाराने MSCIT परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एसचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणीकृत असावा. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे.

या नोकरीसाठी २९ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. मुंबईत नोकरीचे ठिकाण असणार आहे. तुम्ही २६ जुलैपर्यंत अर्ज पाठवू शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज राजावाडी हॉस्पिटल. घाटकोपर पूर्व येथे पाठवायचा आहे. या नोकरीची जाहिरात एकदा वेबसाइटवर जाऊन वाचावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT