कल्याण महानगरपालिका जोरात! ४ दिवसांत तब्बल १११ अनधिकृत बार, ढाबे, टपऱ्यांवर कारवाई
Kalyan NewsSaam Tv

Kalyan News: कल्याण महानगरपालिका जोरात! ४ दिवसांत तब्बल १११ अनधिकृत बार, ढाबे, टपऱ्यांवर कारवाई

KDMC News: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सध्या अॅक्शन मोडवर दिसत आहे. केडीएमसीने चार दिवसात तब्बल १११ अनधिकृत बार, ढाबे, टपऱ्यांवर कारवाई केली आहे.
Published on

अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बार ,ढाबे ,टपऱ्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या चार दिवसात अनधिकृत आठ बार, २ हुक्का पार्लर, ३२ ढाबे, चायनीज तसेच फूड स्टोलअसे मिळून ६९ टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

तर ३३ बारला नोटीस बजावण्यात आलाय आहेत. त्यातच सर्वाधिक चर्चेत असलेला भोईरवाडी परिसरातील बार्बी क्यू स्क्वेअर हे हॉटेल अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच या हॉटेल वरकारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त सोनल देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे आता या कारवाई कडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

कल्याण महानगरपालिका जोरात! ४ दिवसांत तब्बल १११ अनधिकृत बार, ढाबे, टपऱ्यांवर कारवाई
VIDEO: गांधी, हिंदुत्व आणि शिव्या; विधान परिषदेत आज कशावरून वादंग उठला?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने जोरदार कारवाई सुरु केली आहे. आत्तापर्यंत गेल्या चार दिवसात ८ बार, ३२ ढाबे आणि २ हुक्का पार्लर ६९ टपऱ्या यांच्यावर महापालिकेने हातोडा चालविला आहे. तसेच ३३ जणांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यावरही कारवाई केली जाणार आहे.

पाच दिवसापूर्वी सोशल मिडियावर एका हुक्का पार्लरचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा हुक्का पार्लर बिर्ला कॉलेज परिसरातील बार्बी क्यू स्क्वेअर हॉटेलमधील असल्याचे बोलले जात होते. मात्र हा व्हिडीओ बार्बी क्यू स्क्वेअर येथील नसून तो कोळिवली येथील एका ढाब्याचा असल्याचा निष्पन्न झालं. या ढाब्यावर कारवाई देखील करण्यात आली. मात्र बार्बी क्यू स्क्वेयर या ढाब्याच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.

कल्याण महानगरपालिका जोरात! ४ दिवसांत तब्बल १११ अनधिकृत बार, ढाबे, टपऱ्यांवर कारवाई
VIDEO: मोठी बातमी! मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब विजयी

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सोनल देशमुख यांनी सांगितले की, हा ढाबा अधिकृत आहे की अनधिकृत नाही, याची सुनावणी घेतली. त्यावेळी ढाबा चालकाने कागदपत्रे सादर केली. त्याची तपासणी केली. हा ढाबा बेकायदा आहे. या ढाब्याला बांधकाम परवानगी नाही. त्यामुळे तो बेकायदेशीर आहे. यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com