Coast Guard Jobs Saam Tv
naukri-job-news

Coast Guard Jobs: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, तटरक्षक दलात भरती; अर्ज कुठे कराल? जाणून घ्या सविस्तर

Coast Guard Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलात सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

भारतीय तटरक्षक दल म्हणजेच कोस्टगार्डमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे. कोस्टगार्ड मुंबई येथे भरती केली जाणार आहे. १०वी उत्तीर्ण तरुणांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे.या नोकरीबाबत भारतीय तटरक्षक दलाने जाहिरात प्रकाशित केली आहे.

केंद्र सरकारअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. फायरमन (अग्निशमन जवान, लष्कर आणि इतर) पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

कोस्टगार्ड मुंबई येथील नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. इंजिन ड्रायव्हर, लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी, एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, टर्नर या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा म्हणजे १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ३६ रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणाप आहे. गट क पदांवर नियुक्त करण्यात येणारे उमेदवार कोस्ट कार्ड क्षेत्र पश्चिम येथे कोणत्याही युनिटमध्ये काम करावे लागेल.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी indiancoastguard.gov.in या वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती वाचा.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ आहे. द कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस, वरळी कॉलनी, मुंबई ४०००३० येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अमित शहांच्या बॅगांची तपासणी

BKC Metro Fire: बीकेसी मेट्रो स्टेशनला आग; आगीमुळे सर्व मेट्रो थांबवल्या

Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Pune Crime : गार वडापाव दिल्याचा राग; स्नॅक्स सेंटर मालकाला जबर मारहाण

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

SCROLL FOR NEXT