विनोद जिरे, साम टीव्ही बीड
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला होता. ते अजित पवारांच्या संपर्कात आहेत, असं ट्विट करत माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावर आता बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा सवाल करत मिटकरी यांच्यावर पलटवार केला आहे.
राज्यात लोकसभेनंतर राजकीय रंगत वाढत चालली आहे. अजित पवार अन् शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत (Maharashtra Politics) बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. हा दावा बजरंग सोनवणे यांनी फेटाळला होता. परंतु आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींवर पलटवार केला आहे.
खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले?
यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, की अमोल मिटकरी हे कोण आहेत? ते दादांच्या बंगल्यावर एखादे ऑपरेटर आहेत का? ते नेमके कोण आहेत? हे मला माहित नाही, त्यामुळे विचारलं पाहिजे ना अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे कोण आहेत, अशी खोचक टीका बजरंग सोनवणे यांनी केली आहे. दादांच्या बंगल्यावर कोणाचा फोन आला याचे रेकॉर्ड ऑपरेटरकडे असू शकते, म्हणून मी म्हटलं मिटकरी ऑपरेटर आहेत का? असं विचारल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं आहे.
शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले आहेत. जर माझ्यासारखा एखादा खासदार इकडून निवडून येऊन तिकडे गेलाच, तर त्याला पब्लिक तर मारीनच माझ्या घरात माझे वडील देखील मारतील, असंही बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) माध्यमांशी बोलताना म्हटले आहेत. विशेष म्हणजे कोणाला एकमेकाच्या संपर्कात येता येईल? तर ते म्हणजे ज्यांचा एक खासदार आहे, त्यांना आमचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात येता येईल.
कुणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, शरद पवारांची ताकद देशाने पाहिली आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या ताकतीत मला (MP Bajrang Sonawane Criticized Amol Mitkari) पचवता येईना, म्हणून कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचं हे काम आहे, असं म्हणत बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांचा समाचार घेत अजित पवार गटाला टोला लागावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.