NRHM Bharti : आजच अर्ज करा; परीक्षा नाही, अमरावतीमध्ये थेट सरकारी नोकरी, जाणून घ्या सविस्तर
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता, दंच चिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
अमरावती येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. १३० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. (NHM Bharti)
ज्युनिअर इंजिनियर, डेन्टल सर्ज, फिजिओथेरेपिस्ट, डेन्टल असिस्टंट, बजेट आणि फायनान्स ऑफिसर,पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, सोशल वर्कर, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स अशा अनेकपदांसाठी ही भरती केली जाणार आहेत. याबाबत जाहिरात zpamravati.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
डेन्टल सर्जन पदासाठी उमेदवाराने MDS/BDS पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत २ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. न्युट्रिशनिस्ट पदासाठी B.sc.Home Science Nutrition, फिजियोथेरेपी पदासाठी Graduate Degree In Physiotherapy प्राप्त केलेली असावी. याचसोबत फायनान्स ऑफिसर पदासाठी बी कॉम किंवा एम कॉम केलेले असावे.
या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे पाठवायचा आहे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना चांगले वेतन देण्यात येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.