सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयात ज्यूडिशियल असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाने अधिसूचना जाहीर केली आहे.
ज्यूडिशियल असिस्टंट पदासाठी ४० जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर जर काही बदल असतील तर ते १८ ते २० ऑक्टोबरपर्यंत करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केली असावी. त्याचसोबत बोर्ड ऑफ ज्यूडिशियल शॉर्टहँड किंवा टाइपरायटिंगची परीक्षा पास केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ९४३.४० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ७९४ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. (High Court Job)
सध्या ओएनजीसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ओएनजीसीमध्ये २००० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड दिली जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.