Grampanchayat Election 2022 : उपसरपंच निवड या पद्धतीने घ्या : उच्च न्यायालय

या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील उपसरपंच निवडी रंगतदार हाेतील अशी चर्चा आहे.
Court, Sarpanch, Grampanchayat
Court, Sarpanch, Grampanchayatsaam tv
Published On

High Court Order : जनतेतुन निवडून आलेल्या सरपंचाला उच्च न्यायालयाकडुन नव्याने विशेष आधिकार प्राप्त झाल्याने गावकी-भावकीच्या राजकारणात सरपंच पुन्हा सर्वोच्च स्थानी पोहचलेत आहेत. या निर्णयामुळे उपसरपंच निवडीसाठी पहिल्या फेरीत, तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक वेळी ग्रामपंचायत सरपंचांना (sarpanch) दोनदा मतदान करण्याची संधी मिळाली आहे. (Maharashtra News)

उपसरपंच निवडीसाठी पहिल्या फेरीत, तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक वेळी अशी ग्रामपंचायत सरपंचांना दोनदा मतदान करण्याची संमती देणारे परिपत्रक राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने ३० सप्टेंबर रोजी काढले हाेते. त्यास न्यायालयात (court) आव्हान देण्यात आले हाेते.

Court, Sarpanch, Grampanchayat
Sharad Pawar : महाराष्ट्रातील भाजपच्या 'मिशन ४५' वर शरद पवारांनी भाजपाध्यक्ष नड्डांना करुन दिली 'ही' आठवण

उच्च न्यायालयाने दिला असुन या निकालाची अंमलबजावणी सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीवेळी करण्यात यावी. त्यामुळे जनतेतुन निवडून आलेल्या सरपंच दोन वेळा मतदान करुन निवडणूक पुर्ण करतील असं मत निकालात उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. या निर्णयामुळे गावकी भावकीच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचाची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Court, Sarpanch, Grampanchayat
Viral Video : याला म्हणतात जिद्द, आत्मविश्वास! कबड्डी खेळतानाचा आजीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com