Job Recruitment 2024  Saam Tv
naukri-job-news

Job Recruitment 2024 : तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 62 हजार मिळणार पगार, 283 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु

MP Recruitment 2024: मध्य प्रदेशात विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्वरित अर्ज करू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खपू मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने सध्या अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. ज्यामध्ये उमेदवार दिलेल्या 'esb.mponline.gov.in'या अधिकृत साइटवर जाऊन अर्ज भरू शकता. या असलेल्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख '१९ऑगस्ट' निश्चित करण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील साधारण ३ गट उपअभियंता पदांसह अनेक पदांची भरती प्रक्रिया देखील पार पाडली जाणार आहे. अभियानांतर्गत साधारण २८३ पदे या भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. एकूण २७६ पदे रिकामी आहेत.यात २ कंत्राटी (contract)तर ५ अनुशेष अशी पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठी '१२ सप्टेंबर' रोजी भरती परीक्षा पार पडणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमधील आवश्यक 'पदवी' तसेच 'डिप्लोमा' आणि 'आयटीआय' असणे अत्यंत आवश्यक आहे.

आवश्यक मयोमर्यादा

माहितीनुसार, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे तर अर्ज (application)करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे कमाल वय हे ४० वर्षे असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या साधारण राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण श्रेणीकील इच्छुक उमेदवारांसाठी साधारण ५६० रुपये निश्चिक करण्यात आलेले आहे तर अनुसूचित आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना ३१० रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.

पगार

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना ३४ हजार ८०० पर्यंत ते ६२ हजार ८०० रुपये प्रति महिना असे वेतन असल्याचे समजते.

निवड कशी केली जाईल?

या भरती प्रक्रियेतील पदासाठी उमेदवारांची निवडही लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा १२ सप्टेंबर महिन्यात दोन शिफ्टमध्ये घेण्यात येईल. साधारण पहिली शिफ्ट सकाळी ९ते १२ वेळेत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत पार पडेल.

महत्त्वाची तारीख

या भरती(process) प्रक्रियेसाठी अर्जाची सुरूवात ही ५ ऑगस्ट २०२४ पासून सुरू झाली असून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही १९ ऑगस्ट २०२४ आहे.या महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जामध्ये उमेदवारांना काही सुधारणा करायची असल्यास त्यासाठी शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२४ देण्यात आलेली आहे. याची परीक्षा ही १२ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : अनैतिक संबंधाला अडथळा, मावसभावाने काढला भावाचा काटा, नाशिक हादरले!

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कुणाची चलती?

Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

Mumbai News: गोरेगावमध्ये टेम्पोत मोठा स्फोट, एकाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १५ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT