Job Recruitment Stopped: राज्यातील सरकारी नोकर भरती तात्काळ स्थगित करावी...;अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीये.
Job Recruitment Stopped
Job Recruitment StoppedSaam TV
Published On

लक्ष्मण सोळुंके

Job Recruitment Stopped In Maharashtra:

मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्यातील सुरु असलेली सरकारी नोकर भरती तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून करण्यात आलीये. जालना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Job Recruitment Stopped
Mumbai Crime: ATM मशीनमध्ये छेडछाड करून बँकांची लुट, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; ६ जण ताब्यात

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलने सुरू आहे. लवकरच मराठा समाजाला आरक्षण देवू असे सरकारने सांगितले आहे. परंतु ही सर्व प्रक्रिया सुरू असताना राज्यात राज्य शासनाच्या वतीने विविध सरकारी विभागातील पदाच्या भरती प्रक्रिया काढण्यात आल्यात.

यात प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा व जलसंधारण विभाग, नगर परिषदा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, अन्न व पुरवठा विभाग, न्यायालयातील विविध पदे इत्यादी विभागाच्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्या असून भरतीची प्रक्रिया ही युध्द पातळीवर चालू आहे.

तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागाच्या भरती प्रक्रिया मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी मराठा समाजाच्या युवकांनी केलीय. याबाबतचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाने आज जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना दिलंय. आमच्या मागणी बाबत सरकारने विचार न केल्यास राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मराठा समजाच्या तरुणांनी दिलाय.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीये. यासह आता कुणबी प्रमाणपत्र आईकडे असेल तर मुलांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीये. २४ डिसेंबर रोजी त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आहे. ही मुदत संपल्यावर मराठा समाज पुढे काय भूमिका घेणार याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Job Recruitment Stopped
Pune Crime News: बहिणीला त्रास देणाऱ्या भावजीची मित्रांच्या मदतीने हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com