Mazagaon Dock Job Saam Tv
naukri-job-news

Mazgaon Dock Job: फ्रेशर्स आहात? जॉब शोधताय? माझगांव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Mazgaon Dock Recruitment 2025: माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. माझगाव डॉकमध्ये २०० अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. माझगाव डॉकमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा पदवीधर पदांसाठी भरती सुरु आहे. माझगाव डॉकमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. (Mazgaon Dock Recruitment)

माझगाव डॉकमध्ये अप्रेंटिसशिप अॅक्ट १९७३ अंतर्गत २०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

माझगाव डॉकमध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. यामध्ये सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये ५, कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये ५, मेकॅनिकलमध्ये १० रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधित विषयात इंजिनियरिंग डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. (Mazgaon Dock Recruitment 2025)

इंजिनियरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदााठी १२० जागा रिक्त आहेत. त्यात सिव्हिल पदासाठी १०, कॉमप्युटर ५, इलेक्ट्रिकल २५ आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन पदासाठी १० जागा रिक्त आहे. जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट्स अप्रेंटिससाठी ५० पदे भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी बी कॉम/ बी.सी.ए/ बी.बी.ए / बी.एस.डब्ल्यू पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी १ वर्षाच्या अप्रेंटिस पदासाठी डिप्लोमाधारकाना ८००० तर ग्रॅज्युएट्सना ९००० रुपये स्टायपेंड दिली जाईल.

या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी पात्रतेच्या आधारावर शॉर्टलिस्टिंग केले जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी https:// mazagondock. in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. पात्र उमदेवारांची यादी ७ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. त्यानंतर १४ फेब्रुवारीला मुलाखतीसाठी यादी जाहीर केली जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

SCROLL FOR NEXT