Government Job: माझगाव डॉकमध्ये नोकरीची संधी; नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mazgaon Dock Recruitment 2024: माझगाव डॉकमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. माझगाव डॉकमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरतीसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे.
Mazagaon Dock Job
Mazagaon Dock JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. माझगाव शिपबिल्डर्समध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ होती. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्समधील या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सविस्तर माहिती mazgaondock.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Mazgaon dock recruitment)

Mazagaon Dock Job
Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; महिना पगार १८००००; या पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सर्वकाही

माझगाव डॉकमधील या भरती मोहिमेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज केलेले असावे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.(Mazgaon Dock Recruitment 2024)

Mazagaon Dock Job
Indian Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? पगार किती? जाणून घ्या सर्वकाही

माझगाव डॉकमध्ये २३४ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये स्कील १ अंतर्गत २०१ पदे रिक्त आहेत. सेमी स्कील पदांसाठी ३० पदे रिक्त आहेत. स्पेशल ग्रेड पदांसाठी ३ जागा रिक्त आहेत.

माझगाव डॉकमधील नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

माझगाव डॉकमधील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला mazagondock.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन ऑनलाइन रिक्रूटमेंटवर क्लिक करा. त्यानंतर नॉन एक्झिक्युटिव्ह भरती या सेक्शनवर जा.

त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज भरा.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करा.त्यानंतर संपूर्ण माहिती भरुन अर्जप्रक्रिया पूर्ण करा.

अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून स्वतः जवळ ठेवा.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३५४ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

Mazagaon Dock Job
Private Job : सरकारला हायकोर्टाचा दणका! झारखंडमध्ये स्थानिकांना नोकरीत ७५ टक्के आरक्षणाला स्थगिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com