Sleeping Staff: कामावर झोपाल तर नोकरी गमवाल? न्यायालयाचा निर्णय, झोपाळुंचे धाबे दणाणले

Court Decision On Sleeping Staff: कामावर झोपल्यामुळे एका व्यक्तीची नोकरी गेलीय. न्यायालयानेच हा निर्णय दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांची झोप उडालीय.
Sleeping Staff
Court Decision On Sleeping Staffgoogle
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

तुम्ही ऑन ड्युटी डुलकी मारत असाल किंवा झोपा काढत असाल तर सावधान. तुमची नोकरीही जाऊ शकते.कारण उच्च न्यायालयाने ऑन ड्युटी डुलकी मारणाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढलेत.नेमकं काय आहे हे प्रकरण? पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून. तुम्ही कामावर असताना अधून मधून डुलकी घेत असाल तर सावधान. कारण ऑन ड्युटी झोप घेणं हे गैरवर्तन असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय.

Sleeping Staff
Winter Health Care : कडाक्याची थंडी ठरू शकते धोकादायक, डॉक्टरांनी दिला हा सावध इशारा

त्यामुळे झोपाळूंचे धाबे दणाणले आहेत. ड्युटीवर झोप घेतल्याने कामावरून काढलेल्या कामगाराला पुन्हा कामावर घेण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला होता.. तो आदेश उच्च न्यायालयाने रद्द केलाय. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात.

कामावर झोपाल तर नोकरी जाणार?

'असाही' कंपनीच्या वाकड प्लांटमध्ये नदीम डोलारे वॉचमन म्हणून कामाला होता

27 ऑक्टोबर 2006

नाईट शिफ्टदरम्यान चेंजिंग रुममध्ये नदीम झोपल्याचं दिसून आलं

31 ऑगस्ट 2007

कंपनीने शिस्तभंगाची कारवाई करून नदीमवर बडतर्फीची कारवाई केली

बडतर्फीच्या आदेशाला डोलारेने न्यायालयात आव्हान दिलं

शिस्तभंगाची कारवाई रद्द ठरवत थकीत वेतन देऊन नदीमला कामावर घेण्याचा कामगार न्यायालयाचा आदेश

उच्च न्यायालयाच्या संदीप मारणे यांच्या एकलपीठाकडून कामगार न्यायालयाचा निर्णय रद्द

ऑन ड्युटी डुलकी घेणं हे गैरवर्तन असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत.. मात्र हे असं असलं तरी कामगारावर कारवाई करताना त्याच्या सेवेचा रेकॉर्ड विचारात घ्यायला हवा, असा सल्लाही न्यायालयाने कंपनीला दिलाय..तर कंपनीने कामगाराला 22 लाख रुपये एकरकमी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com