Mahatransco Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Mahatransco Recruitment:महाट्रान्स्कोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोल्हापूर येथे सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

Mahatransco Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाट्रान्स्कोमध्ये अप्रेटिंस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. कोल्हापूर येथे नोकरी करण्याची संधी आहे. महाट्रान्स्कोमध्ये एकूण ३७ जागांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

महाट्रान्स्कोमध्ये अप्रेंटिस इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याबाबत सर्व माहिती दिली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२४ आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीत उमेदवारांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायलादेखील मिळणार आहे. इलेक्ट्रिशियन पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून आयटीआय मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

१८ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला आस्थापना क्रमांक EHV O&M DIVISION KOLHAPUR E0520279164 वर नोंदणी करायची आहे. त्यानंतर उमेदवाराला त्याची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT