नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. नागपूरमधील महाविद्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ८८ जागांसाठी ही भरती होणार आहे. असिस्टंट प्रोफेसर, सहायक प्रोफेसर पदासाठी भरती आहे.
नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन (offline)पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २९ ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२४ आहे. मुदतीनंतर कोणत्याही उमेदवार अर्ज करु शकणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील या भरतीत अर्ज(application) करणाऱ्या उमेदवाराने एमडी, डीएम, एमएस पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील शाखांमधील पदव्यूतर उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी उमेदवारांची (candidates)कमाल वयोमर्यादा ४० निश्चित करण्यात आली आहे.महाविद्यालयाच्या भरती बोर्डाद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांचे अर्ज आल्यानंतर त्यातून उमेदवारांची निवड केली जाईल.
निवड केलेल्या उमेदवारांना १३ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाखतीसाठी बोलावले जाईल.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.याबाबत तुम्हाला माहिती देण्यात येईल. शासकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १ लाख रुपये पगार दिला जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.