Bank Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Bank Recruitment 2024: महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कोण करू शकतं, काय आहे प्रक्रिया? वाचा

Maharashtra State Cooperavtive Bank Recruitment: जर तुमचे पदव्युतर शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँकेत भरती सुरु आहे.

Siddhi Hande

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये भरती सुरु आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये ही नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकद्वारे ही भरती घेण्यात येणार आहे. बँकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

सहकारी इंटर्न या पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. एमबीए किंवा २ वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट/ सहकारी व्यवस्थापन/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ ग्रामीण विकास व्यवस्थापन या क्षेत्रात पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. ३२ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ही भरती मुंबई शाखेसाठी करण्यात येत आहे.

या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज आणि कागदपत्रे HRD&M विभाग, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट. मुंबई येथे पाठवावेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. त्याआधी अर्ज पाठवलेल्यात उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केले जाणार आहे. याबाबत सर्व माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT