LIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

LIC HFL Junior Assistant Recruitment: एलआयसी हाउसिंग पायनान्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

एलआयसीमध्ये नोकरीची संधी

ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती

मिळणार भरघोस पगार

सरकारी विमा कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एलआयसीमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एलआयसीच्या फायनान्स हाउस लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती देशातील विविध राज्यांमध्ये होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

एलआयसीच्या या नोकरीसाठी तुम्ही lichousing.com वर जाऊन अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३० एप्रिलपासून अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही १५ मेपर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही. या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज कसा करावा? (LIC Recruitment Application Process)

या नोकरीसाठी तुम्ही ibpsreg.ibps.in/licjamar26/ वर जाऊन अर्ज करु शकतात.

यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.

रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती, फोटो, सही अपलोड करायची आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरायचे आहे. यानंतर प्रिंट आउट काढून ठेवायची आहे.

एलआयसीमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. एलआयसी ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत काम केल्यावर तुम्हाला चांगला अनुभव मिळणार आहे. याचसोबत चांगला पगार, भत्ते आणि अनेक सुविधा मिळणार आहे. त्यामुळे तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुकांनी १५ मेपूर्वी अर्ज करायचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Liquor Ban : सलग ४ दिवस दारूचे दुकान बंद राहणार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT