पुण्यात सकाळ माध्यम समूहाच्या "पेटोपिया" या अनोख्या कार्यक्रमाचे कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म याठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे . पाळीव प्राण्यांच्या बाबत गोडी आणि लळा निर्माण व्हावा तसेच पाळीव प्राण्यांचे हक्क समजून घेण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवता यावा यासाठी "पेटोपिया" या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला पुणेकरांनी सलग दुसऱ्या दिवशी मोठी गर्दी केली होती. डॉग शो, अश्वरोहण स्पर्धा, ॲक्वा झोन मधील मासे, मांजरीच्या विविध प्रजाती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. शनिवारची सुट्टीचे अवचित्य साधत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी या महोत्सवाचे मनमुराद आनंद लुटला. पुण्यातील "पेटोपिया" येत्या रविवार पर्यंत नागरिकांसाठी खुला असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.