मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

महाराणी ताराराणींबाबत जैन मुनींच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. मराठी भाषेच्या उगमावरही प्रश्न उपस्थित केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Jain monk controversy India
Jain monk controversy IndiaSaam TV Marathi
Published On

महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहासाची मोडतोड करण्यात आलीय...जैन मुनींनी अकलेचे तारे तोडत महाराणी ताराराणीबद्दल वादग्रस्त विधान केलयं. आचार्य नयन पद्मसागर नेमकं काय म्हणाले? जैन मुनींनी ताराराणींसह मराठी भाषेवर काय विधान केलयं ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ऐकलतं... 'महाराणी ताराराणी जैन होत्या', असं वादग्रस्त विधान करणारे हे आहेत... आचार्य नयन पद्मसागर... या जैन मुनींनी मुंबईतील एका कार्यक्रमात आक्रमक शैलीत भाषण करत महाराणी ताराराणींबद्दल हे वादग्रस्त विधान केलं...ते ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरचं. इतिहासाची मोडतोड करून जैन मुनी नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका...

Jain monk controversy India
नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणात ट्विस्ट, तृतीयपंथी थेट पोलिसांत पोहचली अन् दिली तक्रार, वाचा अपडेट

महाराणी ताराराणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी असणाऱ्या ताराराणी या मराठा होत्या हे सर्वश्रुत आहे...

मात्र हे जैन मुनी फक्त ताराराणींबद्दल वादग्रस्त विधान करून थांबलेले नाहीत.. तर जैन आर्चायांनी मराठीची रचना केल्याचा दावा करून आचार्य नयन पद्मसागर यांनी नव्या राजकीय वादालाच तोंड फोडलंय....

Jain monk controversy India
Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

आधीच इतिहासाची मोडतोड करून आपल्या सोयीचा इतिहास नव्यानं मांडण्याची पद्धत राज्यात रुढ होत असल्याचं दिसतयं...त्यात आता या जैन मुनींची विधान. मुळात इतिहास हा वर्तमानासाठी दिशादर्शक असायला हवा... मात्र सद्यस्थितीत इतिहासाचा वापर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि धर्माआडून नागरिकांची माथी भडकवण्यासाठी होऊ नये हीच अपेक्षा....

वैदही काणेकर, साम टिव्ही न्यूज

Jain monk controversy India
पाषाणहृदयी! मोठ्या बहिणीच्या दीरासाठी नवऱ्याची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com