UPSC Recruitment : यूपीएससीची मोठी भरती, थेट मंत्रालयात मिळणार पोस्टिंग, वाचा सविस्तर माहिती

Government Jobs: UPSC ने 2026 साठी विविध मंत्रालयांमध्ये 16 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 1 मे 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सरकारी नोकरीची ही मोठी संधी आहे.
Government Jobs
UPSC Recruitment 2026google
Published On

सरकारी नोकरी मिळावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. लोक अनेक परिक्षा उत्तीर्ण होऊन चांगल्या पदावर कामावर रुजू होतात. तुम्हीही जर अशा नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे. नुकतीच संघ लोकसेवा आयोग म्हणजेच (UPSC)मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु केली आहे. तुम्हाला जर याची संपूर्ण माहिती हवी असेल तर बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

नुकतीच UPSC आयोगाने 2026 साठी विविध मंत्रालयांअंतर्गत अनेक पदासांठी भरती सुरु केली आहे. यामध्ये ज्या उमेदवारांची निवड केली असेल, त्यांना संस्कृती मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय अशा विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

Government Jobs
Blood Pressure Risk: हे फळ खाल्लं तर BPचा त्रास वाढणार, आत्ताच व्हा सावध; डॉक्टरांचा सल्ला वाचाच

भरतीची शेवटची तारिख कोणती?

ज्या इच्छूक उमेदवाराला या पदांवर काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी UPSC च्या अधिकृत वेबासाइटला भेट द्यावी लागेल. तसेच या भरतीची प्रक्रिया तारिख ११ एप्रिल २०२६ पासून सुरु झाली आहे. तर याची शेवटची तारिख ही १ मे २०२६ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. याची प्रोसेस ही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. पण उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करणं फायद्याचं राहील. कारण शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाउटवर जास्त लोड आल्या कारणामुळे तुम्हाला अर्ज करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

कोणत्या पदांसाठी भरती आहे?

UPSC आयोगाची भरती ही एकूण १६ पदांसाठी असणार आहे. यामध्ये विविध विभाग असतील. असिस्टेंट कीपरसाठी १ पद, सीनिअर स्टोर ऑफिसर ग्रेड २ साठी ७ पदे तर लाइव्हस्टॉक ऑफिसरसाठी ८ पदांची भरती असणार आहे. उमेदवार त्यांच्या इच्छेनुसार आणि पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करु शकतो.

Government Jobs
Jio Recharge: Jio युजर्ससाठी खुशखबर! एकाच रिचार्जमध्ये मिळेल JioHotstar, Prime Video अन् इतका डेटा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com