Blood Pressure Risk: हे फळ खाल्लं तर BPचा त्रास वाढणार, आत्ताच व्हा सावध; डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Healthy Eating: आवळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचे जास्त सेवन केल्यास अॅसिडिटी, गॅस, लो BP आणि ब्लड शुगर कमी होण्याचा धोका वाढतो, डॉक्टरांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
Eating Too Much Amla Know Its Hidden Side Effects
Overconsumption of Indian Gooseberry Can Be Harmfulgoogle
Published On

उन्हाळ्यात तुम्ही बाजारातून घरी येताना फळं विकत घेऊन येताच. या दिवसांत फळं ही जास्त मिळतात आणि आपण दिवसाला १ तरी फळ खातोच. प्रत्येक फळाचा वेगवेगळा फायदा होत असतो. त्यातलं एक फळं असं आहे की, त्याने फायदे मिळतात पण त्याचा दुष्परिणाम सुद्धा होतो. त्यामुळे तुम्हाला वाढतं ब्लड प्रेशर, अॅसिडिटी, गॅस आणि पोटफुगी अशा पोटासंबंधीत समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. पुढे दिलेली माहिती व्यवस्थित वाचून त्यावर उपचार करु शकता.

बऱ्याच जणांना आवळा खायला प्रचंड आवडतो. त्यामध्ये व्हिटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स आणि इम्युनिटी वाढवणारे गुणधर्म असतात. त्यामुळे काही मंडळी त्यांच्या रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश करतात. पण त्याने पुढील समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

Eating Too Much Amla Know Its Hidden Side Effects
Mini Thailand Tourism : भारतात लपलयं मिनी थायलंड, दृश्य पाहून 99 टक्के लोकांना अजूनही माहीत नाही

1. अॅसिडीटी, गॅस आणि पोटफुगी

तुम्ही रोज जास्त प्रमाणात आवळा खात असाल तर तुम्हाला हे त्रास होऊ शकतात. कारण आवळा हा नैसर्गिकरित्या आम्लीय (acidic) असतो. त्यामुळे अॅसिडिटी किंवा अल्सर असलेल्या लोकांना याचा त्रास होतो.

2. ब्लड शुगर खूप कमी होण्याचा धोका

जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात किंवा रोजच्या रोज आवळा खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढचतं. कारण आवळ्यात ब्लड शुगर कमी करण्याचे गुणधर्म असतात. डायबिटीज असलेल्या आणि औषधं/इन्सुलिन घेत असलेल्या लोकांनी जास्त आवळा घेतल्यावर त्यांना चक्कर येते, थकवा जाणवतो आणि मेंदूवर परिणाम सुद्धा होऊ शकतो.

3. लो ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी धोकादायक

आवळा हा रक्तदाब कमी करण्याचं काम करतो. पण त्यांना आधीपासून लो BP आहे किंवा BP कमी करणारी औषधे घेतात, त्यांच्यासाठी जास्त हा जास्त धोकादायक ठरु शकतो. त्याने विशेषत: उन्हाळ्यात चक्कर येते, अशक्तपणा जाणवतो, उभं राहिल्यावर डोळ्यांसमोर अंधारी येते अशी लक्षणं जाणवतात.

किती प्रमाणात आवळा खावा?

तज्ज्ञांच्या मते, दररोज 1 ते 2 आवळे किंवा त्याच्या रस किंवा पावडर खाणं योग्य राहील. जास्त प्रमाणात आवळा खाणं टाळा. शरीरातले बदल लक्षात घ्या आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eating Too Much Amla Know Its Hidden Side Effects
Blouse Sleeves Design: महिलांमध्ये ब्लाउजची जबरदस्त क्रेझ, पाहा लग्नसराईसाठी नवे पॅटर्न्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com