Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Jobs : लोको पायलट ते स्टेशन मास्तर, कोकण रेल्वेत नोकरीची संधी;५०,००० रुपये मिळणार पगार, आजपासून प्रोसेस सुरू

Kokan Railway Recruitment: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. लोको पायलट ते स्टेशन मास्तर अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेत नोकरीची संधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ सप्टेंबर २०२४ म्हणजेच आजपासून सुरु होणार आहे.

कोकण रेल्वेत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावेत. तुम्ही कोकण रेल्वेच्या kokanrailway.com वर जाऊन अर्ज करु शकतात.

कोकण रेल्वेच्या या भरती मोहिमेत १९० पदे भरली जाणार आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर, टेक्निशियन, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवाइजर, ट्रॅक मेंटेनर या पदासांठी भरती होणार आहे. या भरतीसाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मूळ रहिवासी अर्ज करु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२४ आहे. तुम्ही ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर पदासाठी मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशियक पदासाठी संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (Kokan Railway Recruitment)

१८ ते ३६ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. पदानुसार अॅप्टीट्यूट टेस्ट होईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल. त्यानंतर उमेगवारांची निवड करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ८८५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी सिनियर सेक्शन इंजिनियर पदासाठी ४९००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. टेक्निशियन पदासाठी १९९०० रुपये वेतन मिळणार आहे. स्टेशन मास्तर पदासाठी ३५४०० रुपये वेतन मिळणार आहे. (Kokan Railway Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

SCROLL FOR NEXT