अनेकांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. सरकारी नोकरी म्हटल्यावर सर्वांनाच स्पर्धा परीक्षा आठवतात. परंतु तुम्ही स्पर्धा परीक्षा न देताही सरकारी नोकरी मिळवू शकतात. सध्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.
कायद्याचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये लॉ ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी कायद्याचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. (Indian Oil Recruitment)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १२ लॉ ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०२४ आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये लॉ ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एलएलबी (LLB) ग्रॅज्युएट डिग्री किंवा ५ वर्षांचा इंटीग्रेटेड एलएलबी डिग्री प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. (Indian Oil Corporation Limited)
उमेदवारांची निवड ही CLAT 2024 परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यानंतर ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
कॅनरा बँकेत भरती
सध्या कॅनरा बँकेतदेखील शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॅनरा बँकेत तब्बल ३००० अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.