Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. पश्चिम रेल्वेत ५०६६ पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Western Railway Jobs
Western Railway JobsSaam Tv
Published On

रेल्वेत नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चित रेल्वेत सध्या भरती सुरु आहे. पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेत तब्बल ५,०६६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. पश्चिम रेल्वेत नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.

Western Railway Jobs
Government Jobs: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी कामाची बातमी, NIACL कंपनीत ३२५ पदांसाठी भरती; जाणून घ्या

पश्चिम रेल्वेत शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. दहावी पास किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे.

पश्चिम रेल्वेतील अप्रेंटिस पदासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे.या नोकरीसाठी मेरीट लिस्टवरुन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.

Western Railway Jobs
Canara Bank Job: कॅनरा बँकेत बंपर ओपनिंग, तब्बल ३००० पदांसाठी भरती; तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

सध्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्येही भरती सुरु आहे. नर्स या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी नर्सिंगचा कोर्स केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २४००० रुपये पगार मिळणार आहे.

Western Railway Jobs
BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com