Railway Recruitment Saam Tv
naukri-job-news

Railway Recruitment: १०वी पास आहात? रेल्वेत नोकरीची संधी; ३२४३८ पदांसाठी भरती; अर्जासाठी उरले फक्त दोन दिवस

Railway Recruitment 2025: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तब्बल ३२००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. (Railway Jobs)

रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत आयटीआयमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. रेल्वेतील ग्रुप डी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३६ असणे गरजेचे आहे.

रेल्वेत ग्रुप डी भरतीमध्ये इंजिनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट लोको शेड, सहाय्यक, पॉइंट्समॅन बी, ट्रॅक मेटेंनर पदांसाठी भरती होणार आहे.

रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, फिजिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणीनंतर होणार आहे. यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. त्यांना बेसिक सॅलरी १८००० रुपये असणार आहे. याचसोबत इतर अनेक भत्तेदेखील दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni Photos: पारंपारिक साडी अन् सौंदर्य, सोनाली कुलकर्णीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

Corruption Exposed : २.६२ कोटींची रोकड, ९ फ्लॅट अन् लक्झरी गाड्या; सरकारी अधिकाऱ्याला CBI ने लाच घेताना रंगेहात पकडले

Kamali: कमळी आणि सरोजची होणार तुरुंगात भेट? 'कमळी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

कल्याण - डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली; शरद पवार गटातील बडा नेता गळाला लागला

SCROLL FOR NEXT