Tesla Company Jobs: मोदी-मस्क यांच्या भेटीनंतर टेस्लाची भारतात एंन्ट्री; Tesla मध्ये नोकरभरती, मुंबईतील तरुणांनाही संधी

Tesla Begins Hiring In India: टेस्लाची भारतात एंन्ट्री होणं निश्चित झालंय. टेस्ला इंडियाने भारतासाठी linkedinवर नोकर भरती काढण्यात आलीय. दरम्यान अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलन मस्क यांची भेट झाली होती.
Tesla Company Jobs
Tesla Begins Hiring In IndiaSaam Tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असताना टेस्लाचे संस्थापन एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारतातील तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. टेस्ला येत्या काही दिवसांत आणखी नोकरभरती करू शकते, असाही अंदाज आहे. टेस्ला कंपनीने भारतात नोकरभरती सुरू केलीय. यासंदर्भात त्यांनी लिंक्डइन पेजवर जाहिरात केलीय.

मुंबई आणि दिल्लीतील तरुणांना टेस्लामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. या नियुक्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यात टेस्लाने १३ नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पीएम मोदी आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यातील भेट झाली. ही भेट खूप सकारात्मक होती.

मुंबईत कोणत्या पदासाठी भरती?

टेस्लामध्ये नोकरभरती केली जाणार असून त्यासाठी जाहिरात काढण्यात आलीय. लिंक्डइन पेजवरील जाहिरातीनुसार कस्टमर सर्व्हिस आणि बॅकएंड कामांसाठी १३ पदे भरली जाणार आहेत. भारत अनेक वर्षांपासून टेस्ला आणण्याची तयारी करत होता. टेस्लासुद्धा भारतात येण्यास उत्सुक होती.

Tesla Company Jobs
Railway Jobs : कामाची बातमी! १२ वी पास विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे भरणार?

भारताचे कर आणि ड्युटीज या सगळ्यांमुळे अडचणी येत होत्या. मात्र टेस्ला भारत येणार असल्याचा मार्ग आधीपेक्षा आता अधिक सुकर झालाय. सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिकांसह किमान ५ पदे मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांसाठी भरण्यात येणार आहेत. तर उर्वरित पदे, जसे की कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर (customer engagement manager) आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ (delivery operations specialist) ची पदे मुंबईतून भरण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Tesla Company Jobs
Indian Bank Job: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये सेवा सल्लागार, भाग सल्लागार, सेवा तंत्रज्ञ, सेवा व्यवस्थापक, विक्री आणि ग्राहक समर्थन, स्टोअर व्यवस्थापक, विक्री आणि ग्राहक समर्थन, व्यवसाय ऑपरेशन विश्लेषक, ग्राहक समर्थन पर्यवेक्षक, ग्राहक समर्थन विशेषज्ञ, वितरण ऑपरेशन विशेषज्ञ, ऑर्डर ऑपरेशन विशेषज्ञ,यामध्ये वितरण ऑपरेशन विशेषज्ञ, ऑर्डर ऑपरेशन विशेषज्ञ, विक्री सल्लागार आणि ग्राहक प्रतिबद्धता व्यवस्थापकची पदे भरली जाणार आहेत.

कंपनीचे संस्थापक आणि अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर टेस्लाने भारतात केलेल्या नियुक्त्या केल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहिली जातेय. टेस्ला आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून सतत एकमेकांशी संवाद साधत आहे. परंतु उच्च आयात शुल्कामुळे कार निर्माता कंपनी दक्षिण आशियाई राष्ट्रापासून दूर राहिली होती. भारताने आता ४० हजार डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या उच्च दर्जाच्या कारवरील मूलभूत सीमा शुल्क ११० टक्के वरून ७० टक्क्यांपर्यंत कमी केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com