IOCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा करावा?

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइलध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन iocl.com अर्ज करु शकतात. याचसोबत अप्रेंटिसशिप पोर्टलवर अर्ज करु शकतात.

पात्रता

इंडियन ऑइलमधील अप्रेंटिसशिप पदांसाठी उमेदवारांनी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत त्यांनी ITI / NCVT सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ब्रँचमध्ये ३ वर्षांचा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग डिप्लोमा/ आर्ट्स, सायन्स, कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करायचे आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी https://nats.education.gov.in/student_register.php या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी https://nats.education.gov.in/student_register.php या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

कागदपत्रे

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. यासाठी फोटो, सही, १०वीची मार्कशीट,१२वीची मार्कशीट, आयटीआय, डिप्लोमा, डिग्री सर्टिफिकेट प्राप्त असावे. याचसोबत आधार कार्ड आणि पॅनकार्डदेखील असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेद्वारे शॉर्टलिस्टिंग केली जाते. यानंतर १२ महिन्यांसाठी तुम्हाला अप्रेंटिस पदावर काम करायचे आहे. या नोकरीसाठी विविध राज्यात पदे भरली जाणार आहे. महाराष्ट्रात १७९ पदांसाठी भरती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT