Indian Oil Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Recruitment: परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; इंडियन ऑइलमध्ये ४५७ पदांसाठी भरती; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ४५७ अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ट्रेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Indian Oil Recruitment)

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. तुम्ही iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे. एकूण ४५७ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पाच वेगवेगळ्या ठिकाणी भरती केली जाणार आहे. (Indian Oil Recruitment 2025)

इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २४ असणे गरजेचे आहे.इंडियन ऑइलमधील टेक्निकल अप्रेंटिसशिप पदासाठी उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशनमध्ये शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच इतर पदांसाठी त्या त्या ट्रेडमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा डिग्री प्राप्त केलेली असावी. डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी कमीत कमी १२ वी पास असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. मेरिट लिस्ट त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार असणार आहे. इंडियन ऑइलमधील या भरतीसाठी अप्रेंटिस पदासाठी स्टायपेंड मिळणार आहे.

अंगणवाडी भरती (Anganwadi Bharti)

सध्या महाराष्ट्रात अंगणवाडी भरती सुरु आहे. १८८८२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. महिलांना त्यांच्यात गावात, स्थानिक ठिकाणी नोकरी करायची ही उत्तम संधी आहे.याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT