Anganwadi Bharti: अंगणवाडीत सर्वात मोठी भरती! १८८८२ पदे भरणार;पात्रता अन् अटी काय? जाणून घ्या सविस्तर

Anganwadi Bharti 2025: अंगणवाडीत सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १८ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
Anganwadi Bharti
Anganwadi BhartiSaam Tv
Published On

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीत सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. अंगणवाडीत तब्बल १८८८२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. अंगणवाडीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका म्हणून ५६३९ पदे रिक्त आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ जागा रिक्त आहेत. या योजनेची पात्रता काय? कोण अर्ज करु शकतं?याची सर्व माहिती जाणून घ्या. (Anganwadi Bharti)

Anganwadi Bharti
NTPC Recruitment: सरकारी कंपनीत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; NTPC मध्ये भरती सुरु; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

नियम

महिला व बालविकास विभागातील या नोकरीसाठी विहित नमुना देण्यात आला आहे. या नमुन्यातील अर्ज आणि सर्व माहिती, कागदपत्रे भरावेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांनी किमान २वी पास असणे गरजेचे आहे. पदवीधऱ असलेल्या उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक पात्रतेचा पुरावा देणे गरजेचे आहे.

अंगणवाडीतील या भरतीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तर विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० र्षे आहे.

महिला ही संबधित महसुली गाव, वाडा, वस्ती येथील स्थानिक रहिवासी असावी.

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास जास्तीत जास्त २ अपत्ये असणे गरजेचे आहे. अर्जदार महिलेला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

अंगणवाडी पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला पंचायत राज संस्थाच्या सदस्य असल्याचा राजीनामा द्यावा लागेल.

अंगणवाडी सेविकांचा अर्ज हा कार्यालयीन वेळे स्विकारला जाईल. याचसोबत आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

अंतिम निवडीपूर्वी निकषात केलेल्या बदलांमध्ये पात्र असणे गरजेचे आहे.

अर्जासोबत दिलेल्या कागदपज्ञांचा विचार केला जाईल. शैक्षणिक आणि इतर अर्हतेचे गुणांकन ग्राह्य धरले जाईल.

Anganwadi Bharti
Anganwadi Bharti: १२वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

महिला फक्त एकाच पदासाठी अर्ज करु शकतात.

अर्जात खोटी माहिती असेल तर अर्ज बाद केले जातील.

विधवा व अनाथ उमेदवाराला समक्ष प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र अणे गरजेचे आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद निवळ मानधनी तत्वार असल्याने शासनाचे सर्व लाभ महिलांना मिळणार आहेत.

अंगणवाडीच्या अनुभवासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

Anganwadi Bharti
Anganwadi Bharti: सर्वात मोठी भरती! अंगणवाडीत १८८८२ नोकऱ्या;अंगणवाडी सेविका,मदतनीसांसाठी अर्ज करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com