Indian Oil Job Saam Tv
naukri-job-news

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमधील या नोकरीबाबत सर्व माहिती iocl.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इंडियन ऑइलमध्ये मेडिकल स्पेशलिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इंडियन ऑइलच्या भरती माध्यमातून गुवाहाटी रिफायनरी हॉस्पिटलमध्ये ९ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Indian Oil Job)

इंडियन ऑइलमध्ये पॅथेलॉजिस्ट, त्वचा विशेषज्ञ, दंत चिकित्सक, ईएनटी विशेषज्ञ, मनोचिकित्सक, होमियोपॅथी डॉक्टर, सर्जन, कार्डियोलॉजिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासह मुलाखतीच्या ठिकाणी उभे राहायचे आहे.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत डेप्युटी जनरल मॅनेजर कार्यालय, गुवाहाटी रिफाइनरी हॉस्पिटल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, गुवाहाटी येथे उपस्थित राहायचे आहे. (Indian Oil Recruitment)

अन्न व औषध प्रशासन विभाग भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सध्या अन्न वऔषध प्रशासनाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनात विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ (गट ब ) आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १ लाख १२ हजार रुपये पगार मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT