Indian Navy Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; 'संगीतकार' पदासाठी भरती; असा करा अर्ज

Indian Navy Agniveer Recruitment 2024: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात संगीतकार या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदासाठी भारतीय नौदलाने अर्ज मागवले आहेत.

Siddhi Hande

भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी आहे. भारतीय नौदलाने संगीतकार (Musician)पदासाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्हाला गाण्याची आवड असेल किंवा एखादे वाद्य वाजवता येत असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला इंडियन नेव्हीच्या joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२४ आहे.

पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. उमेदवाराचे शिक्षण सरकारद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून पूर्ण झाले असावे. उमेदवारेने मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली असावी. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ नोव्हेंबर २००२३ ते ३ एप्रिल २००७ दरम्यान झाल असावा.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी निवड स्क्रिनिंग टेस्टद्वारे केली जाईल. सर्वप्रथम प्राथमिक स्क्रिनिंग टेस्ट आणि फायनल स्क्रिनिंग टेस्ट घेतली जाईल. यामधील उमेदारांच्या कामगिरीवर उमेदवाराची निवड केली जाईल. यामध्ये stage 1 साठी उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग प्राथमिक स्क्रिनिं मॅट्रिक परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. यानंतर निड झालेल्या उमेदवारांना कॉल अप लेटर दिले जाईल. यामध्ये त्यांची शारीरिक फिटनेस टेस्ट (PFT), म्युझिक स्क्रिनिंग टेस्ट आणि वैद्यकीय टेस्ट घेतली जाईल. यानंतर फायनल स्क्रिनिंगमध्ये पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल. ही यादी www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर २४ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध केली जाईल.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातील ३० हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. याशिवाय रिस्क, हार्डशिप, युनिफॉर्म आणि प्रवास भत्ता दिला जाईल.

अर्ज कसा करायचा

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला joinindiannavy.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • यानंतर इंडियन नेव्ही अग्नीवीर भरती २०२४ या लिंकवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक उपलब्ध होईल. या लिंकवर क्लिक करा आणि लॉग इन करा.

  • यानंतर आवश्यक माहिती भरुन अर्ज करा. यानंतर अर्ज फी भरा. हा फॉर्म सबमिट करुन डाउनलोड करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT