Explainer : भाजपचं अध्यक्षपद किती पॉवरफुल असतं? निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या एका क्लिकवर

explainer about bjp president Post : सत्ताधारी भाजप पक्षाचं अध्यक्षपदाची ताकद किती असते? या पदाची निवड प्रक्रिया कशी असते, भाजप पक्षातील सर्व महत्वाच्या बाबी जाणून घ्या एका क्लिकवर
भाजपचं अध्यक्षपद किती पॉवरफुल असतं? निवड प्रक्रिया कशी असते? जाणून घ्या एका क्लिकवर
J P NaddaSaam TV

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. त्यानंतर राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. आता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपच्या अध्यक्ष बदलीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सध्या भाजपचे अध्यक्षपद जेपी नड्डा यांच्याकडे आहे. त्यांचा कार्यकाळ संपत आला असून आता नवे भाजप अध्यक्ष कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भाजप अध्यक्षपद दुसऱ्याच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या अध्यक्षपदाबाबत पक्षाच्या संसदीय बैठकीत निवड प्रक्रिया होईल. पंतप्रधान मोदी १३ जून ते १५ जूनपर्यंत इटलीच्या दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या इटलीच्या दौऱ्यानंतर भाजपच्या अध्यक्षपदाबाबत पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया कशी असते?

भाजपच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरणारा उमेदवार हा कमीत कमी १५ वर्ष पक्षाचा प्राथमिक सदस्य असावा लागतो. तसेच राष्ट्रीय कार्यकारणीतील कमीत कमी २० सदस्य हे कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाचा प्रस्ताव सादर करू शकतात. या प्रस्तावाला कमीत कमी ५ राज्यांच्या प्रदेश कार्यकारिणीची सहमती असणे गरजेची असते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रस्तावावर उमेदवाराची सही असणे गरजेचे आहे.

भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?

भाजपच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. एक व्यक्ती फक्त दोनदा अध्यक्ष होऊ शकतो. या व्यतिरिक्त पक्षातील कार्यकारिणी, परिषद, समितीमधील पदाचा कार्यकाळ देखील ३ वर्षांचा असतो. १८ वर्ष पूर्ण झालेला कोणताही व्यक्ती पक्षातील सदस्य होऊ शकतो. मात्र, या व्यक्तीचे संबंध इतर राजकीय पक्षाशी नसावेत. भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद पक्षात सर्वोच्च पद मानलं जातं. या पदावरील व्यक्तीवर पक्षाची मोठी जबाबदारी असते.

दरम्यान, जेपी नड्डा जून २०१९ साली पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष झाले. त्यानंतर २० जानेवारी २०२० साली पक्षाचे पूर्णवेळ अध्यक्ष झाले. त्यानंतर २०२२ साली पुन्हा त्यांना अध्यक्ष करत त्यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आला. आतापर्यंत भाजप अध्यक्षपदावर अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरीसहित इतर नेत्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com