MNS vs Aaditya Thackeray : वरळीत मनसेचा उमेदवार ठरला? आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसैनिकांची जोरदार फिल्डिंग, Video पाहा

Amit Thackray vs Aaditya Thackeray : वरळीत मनसेचा उमेदवार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे वरळीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली आहे.
 वरळीत मनसेचा उमेदवार ठरला? आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसैनिकांची जोरदार फिल्डिंग
MNS vs Aaditya ThackeraySaam tv

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. मनसैनिकांनीही वरळी विधानसभा मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. मनसैनिकांनीही बॅनरबाजीतून थेट वरळीचा उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

वरळीत मनसैनिकांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली आहे. मनसेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली आहे. मनसैनिकांनी विधानसभेत आदित्य ठाकरेंना पाडण्याची भाषा सुरु केली आहे. वरळीत मनसैनिकांनी संदीप देशपांडे यांचे बॅनर लावले आहेत.

 वरळीत मनसेचा उमेदवार ठरला? आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसैनिकांची जोरदार फिल्डिंग
Sanjay Raut News: 'मराठा-ओबीसी संघर्ष दुर्दैवी, सरकारवर कुणाचाही विश्वास नाही', संजय राऊतांचा टोला; सर्वपक्षीय चर्चेचे केले आवाहन

वरळीत मनसे कार्यकर्ता हर्षल खरात यांनी संदीप देशपांडे यांच्यासाठी बॅनरबाजी सुरु केली आहे. मनसैनिकांनी वरळीत विधानसभेसाठी संदीप देशपांडे यांना जिंकवण्याचा निर्धार केला आहे. मनसेकडून वरळीत संदीप देशपांडे यांचं नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

वरळीत महाविकास आघाडीला कमी लीड

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत वरळीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं. लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभात महाविकास आघाडीचे उमेदवर अरविंद सावंत यांना ६४,८४४ मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांना ५८१२९ मते मिळाली. वरळीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला कमी मताधिक्य मिळाल्याने आदित्य ठाकरेंची चिंता वाढली आहे. त्यातच मनसैनिकांनी आदित्य ठाकरेंना पराभव करण्याची तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

 वरळीत मनसेचा उमेदवार ठरला? आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसैनिकांची जोरदार फिल्डिंग
OBC Protest Beed: 'विधानसभा निवडणुकीत नेत्यांना गावबंदी करू', बीडमध्ये ओबीसी बांधव आक्रमक; मुंडन करून केला सरकारचा निषेध |VIDEO

वरळीत अमित ठाकरेंकडून कार्यकर्त्यांचा भेटीगाठी

दुसरीकडे वरळीत विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांनीही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. अमित ठाकरे यांनी वरळतीली मनसैनिकांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वरळीत दोन ठाकरेंमध्ये महाभारत रंगणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com