Indian Army Job Saam Tv
naukri-job-news

Indian Army Recruitment: इंडियन आर्मीत नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; मिळणार पगार २ लाख रुपये; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. इंडियन आर्मीत सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

आर्मीत भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे अनेकजण आर्मी भरतीची वाट पाहत असतात. जर तुम्हाला इंडियन आर्मीत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन आर्मीत १४२व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC-142) अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

इंडियन आर्मीत नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

इंडियन आर्मीत एकूण ३० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.

इंडियन आर्मीत सिविल इंजिनियरिंग पदासाठी ८ जागा रिक्त आहे. कॉम्प्युटर सायन्स/ IT पदांसाठी ६ जागा रिक्त आहे. इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम / दूरसंचार पदासाठी ६ जागा रिक्त आहे. मेकॅनिकल / एयरो / इंडस्ट्रीयल इंजिनियर पदासाठी ६ जागा रिक्त आहेत.

इंडियन आर्मीततील या नोकरीसाठी २० ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. २ जानेवारी १९९९ ते १ जानेवारी २००६ पर्यंत जन्मलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी उमेदवाराकडे संबंधित इंजिनियरिंग स्ट्रीममध्ये B.E/B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत अंतिम वर्षातील उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

लेफ्टनंट लेव्हल पदासाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. कॅप्टन लेव्हल पदासाठी ६१,३०० ते १,९३,९०० रुपये तर मेजर लेव्हल पदासाठी ६९४०० ते २,०७,२०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT