Indian Army Recruitment Saam Tv
naukri-job-news

Indian Army Recruitment: देशसेवा करण्याची तरुणांना सुवर्णसंधी; भारतीय सैन्यदलात ३७९ जागांसाठी भरती, वाचा डिटेल्स

Siddhi Hande

देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी भरती जाहीर केली आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या मोहिमेत ३७९ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून १४ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी SSC (Tech) पुरुष पदासाठी ३५० रिक्त जागा आहेत. तर SSC (Tech) महिला पदासाठी २९ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. इंजिनियर पदवी प्राप्त किंवा या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात अभ्यास करणारे उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असलेल्या उमेदवारांना १ एप्रिल २०२५ पर्यंत सर्व परीक्षांच्या गुणपत्रिका सादप करायच्या आहेत. त्यानंतर त्यांना प्री कमिशनिंग ट्रेनिंग अकादमी येथे प्रशिक्षण दिले जाईल.

२० ते २७ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे.

या नोकरीसाठी उमेदवाराची निवड कट ऑफच्या आधारे केली जाईल.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यांमध्ये केली जाईल. पहिल्या टप्प्यात पास झालेले उमेदवार दुसऱ्या टप्प्यापर्यंत जातील. त्यांमी SSB मुलाखतीद्वारे गुणांवर मिळालेल्या गुणांवर आधारित उमेदवारांची निवड केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT