Maharashtra Politics: ठाकरेंमुळे मविआचा उमेदवार पडला?, विधानपरिषदेचं गणित कुठं फसलं?

Sharad Pawar On Vidhan Parishad Election Result: विधानसभेत संख्याबळ नसतानाही सातत्याने विधानपरिषद जिंकण्याचा करिष्मा करणाऱ्या जयंत पाटलांना यंदा मात्र पराभवाचा धक्का बसला. मात्र जयंत पाटलांच्या पराभवासाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जबाबदार धरलंय.
Maharashtra Politics: ठाकरेंमुळे मविआचा उमेदवार पडला?,  विधानपरिषदेचं गणित कुठं फसलं?
Vidhan Parishad Election Result 2024Saam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही

विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या जयंत पाटलांचा पराभव झाल्याची चर्चा रंगलीय. याच चर्चेला पवारांच्या विधानामुळे पुष्टी मिळालीय. तसंच शरद पवारांनी दिलेली रणनीती महाविकास आघाडीनं का अंमलात आणली नाही आणि गणित कुठं फसलं? यावरचा हा खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत...

विधानसभेत संख्याबळ नसतानाही सातत्याने विधानपरिषद जिंकण्याचा करिष्मा करणाऱ्या जयंत पाटलांना यंदा मात्र पराभवाचा धक्का बसला. मात्र जयंत पाटलांच्या पराभवासाठी शरद पवारांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जबाबदार धरलंय. कारण लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांना जागा न सोडल्यामुळे विधानपरिषदेत संधी देण्याचं आश्वासन देण्यात मविआनं दिलं होतं असा दावा पवारांनी केलाय. त्यामुळेच आपण शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या रणनीतीतही मतभिन्नता होती अशी कबुली शरद पवारांनी दिली.

Maharashtra Politics: ठाकरेंमुळे मविआचा उमेदवार पडला?,  विधानपरिषदेचं गणित कुठं फसलं?
Maharashtra Politics: शिवसेनेत मोठ्या राजकीय घडामोडी! अंबरनाथ आणि उल्हासनगर कार्यकारणी बरखास्त ; पक्षश्रेष्ठींचा महत्वाचा निर्णय

ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे निवडणूक अटळ झाली. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी पवारांनी आपला अनुभव पणाला लावत मविआचे तिघे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी विजयाचं गणित मांडलं. मात्र त्यांची रणनीती काँग्रेस आणि ठाकरे गटाला मान्य नव्हती हे निकालातून सिद्ध झालं.

Maharashtra Politics: ठाकरेंमुळे मविआचा उमेदवार पडला?,  विधानपरिषदेचं गणित कुठं फसलं?
Sharad Pawar: गणित जुळवलं असतं तर तिन्ही उमेदवारांचा विजय झाला असता; शरद पवारांचं खळबळजनक विधान

लोकसभेला शरद पवारांनी छोट्या पक्षांना दिलेला शब्द पाळला असला तरी ठाकरेंनी शब्द पाळला नसल्याची भावना छोट्या पक्षांची झालीय. त्यातच समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटलांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आणि विधानपरिषद निवडणूकीत ठाकरेंमुळेच उमेदवार पडल्याचा आरोप केला. त्यामुळे लोकसभेला पाठीशी राहिलेले छोटे पक्ष विधानसभेला वेगळी चूल मांडणार की महाविकास आघाडीतच लढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Politics: ठाकरेंमुळे मविआचा उमेदवार पडला?,  विधानपरिषदेचं गणित कुठं फसलं?
Sanjay Raut On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ मोठे कलाकार, शरद पवार नटसम्राट; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com